नवदुर्गा
आश्विन मासी शुद्ध प्रतिपदेला,
आले हो नवरात्र नवदुर्गेचे.
स्थापना करू आदिशक्तीची,
स्वागत करूया, जगतजननीचे.||1||
पहिले रूप हो तीचे "शैलपुत्री,"
तिच्या स्मरणाने, मन होईल शांत.
दुसरे रूप हो तिचे, "ब्रह्मचारिणी,"
ब्रह्मचर्यामुळे सामर्थ्य होई प्राप्त.||2||
तिसरे रूप हो तिचे, "चंद्रघंटा,"
ललाटावर चंद्र धारण ,करु तिचे पूजन.
चौथे रूप हो तिचे "कुष्मांडा, "
ब्रम्हांडाची निर्मिती ,करी यश प्रदान.||3||
पाचवे स्वरूप हो "स्कंदमाता, "
स्मरण करु तिचे मनोमनी.
सहावे रूप हो "कात्यायनी,"
मोक्षाची प्राप्ती होई पूजनानी.||4||
सातवे रूप हो तिचे "कालरात्री, "
रूप भयंकर ,फलदायी शुभंकरी.
आठवे रूप हो दुर्गेचे "महागौरी,"
पार्वतीच्या रूपात कठोर तपस्या करी.||5||
नववे रूप हो , देवीचे "सिद्धिदात्री,"
सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करी.
महामाया ही भगवती , असूरनाशिनी,
भक्तजन मातेचा जयजयकार करी.||6||