Showing posts with label Vithhal kavita. Show all posts
Showing posts with label Vithhal kavita. Show all posts

Wednesday, July 17, 2024

Marathi Kavita - पंढरपुर आम्हां काशी

मराठी कविता -  पंढरपुर आम्हां काशी 


Marathi Kavita on Vitthal -  पंढरपुर आम्हां काशी


पंढरीचा पांडुरंग 

आम्हां आराध्य दैवत, 

आषाढी वारीत वारकरी

 उत्साह आनंदाने नाचत.


ऊन, वारा, पाऊस अंगावरी 

झेलित चाले वैष्णवजन, 

विठूरायाला भेटण्याची आस 

 मुखाने करी नामस्मरण. 


टाळ मृदुंगाची साथ

कीर्तन सुखाची पर्वनी,

हरिपाठ, पाऊली करत

वारकरी माऊलीच्या दर्शनी.


 दिंड्या, पताका, पालख्या

 एकत्र होई पंढरीत, 

 विठू नामाचा गजर

 रात्रंदिन चाले वारीत.


 चंद्रभागेच्या वाळवंटी 

 फुलला वैष्णवांचा मळा,

 वैष्णव दंग अभंगात

 अनुपम्य हा सोहळा.


 आत्मबोध होण्या वारी 

 विठ्ठल नाम अविनाशी, 

 विठ्ठल रखुमाई मायबाप

 पंढरपूर हे आम्हां काशी.

गणेशाचे आगमन - मराठी कविता

  गणेशाचे आगमन   भाद्रपद  चतुर्थीला  गणेशाचे  आगमन, सर्वांरंभी  पूजोनीया  करू स्वागत वंदन.  महादेव  पार्वतीचा  सुकुमार  गणपती,  स्वामी चौसष्...