The Blog contains the collection of Marathi Poems which are written by Mrs. Surekha Borkar. माझ्या मनातील भाव म्हणजे माझी कविता, भावना काव्य रुपाने नित वाहे ती सरिता||१|| कवीमन नाजुकसे कागदावर उतरे, कोवळे, हळवे ,शांत सत्य ,वास्तव साकारे||२|| भावभावनांचा मेळ माझ्या कवितेचा गाव, हृदयाला पाझर फुटे घेई मनातील ठाव ||३|| कविता माझा आनंद नाद लहर तरंग, प्रतिसाद देई मन रसिक माझा श्रीरंग ||४|| अक्षरें ती शब्दरूपी कळ्या, पुष्पे वेचियेले, मनाचीये भावनेने श्रीहरीस अर्पियेले ||५||
Tuesday, March 28, 2023
Ram Navami Poem - राम नवमी कविता
Sunday, March 19, 2023
Shri Gajanan Marathi Poem - श्री गजानन मराठी कविता
श्री गजानन हे बुद्धीचे देवता आहे ज्यांना सर्व विघ्न दूर करणारे देवता हि म्हटले जाते. ते सर्व कार्यांमध्ये प्रथमपुज्य आहे. त्यांच्या दर्शनाने मात्र सर्वांच्या मनात आनंद, उत्साह, जगण्याचे बळ आणि सगळ्यांना सुख-समृद्धी मिळते. त्याच्या नामाचा जप करणे, त्यांची आरती करणे हे सगळ्या भाविकांना प्रिय असतं. गणेशाचं नाम सर्वांना खूप मोठं आनंद देतो. गणेश आणि त्याच्या नामाचं गुणगान करतांना जीवनात आनंदच येतो आणि अनेकांच्या कष्टाचे समाधान होते. हा अनुभव सुखाचा आणि शांतीचा असतो. ह्या ब्लॉग ची सुरवात मी श्री गजाननाच्या मराठी कवितेने (shri ganesh marathi poem) करणार आहे.
श्री गजानन मराठी कविता - Shri Gajanan Marathi Kavita
प्रथम नमन हेश्री गजानना तुजला,भक्तगण पूजती तुलासद्बुद्धी दे तूं मजला.
ओंकार स्वरूप तूंगौरी पुत्र विनायक,एकदंत विघ्ननिवारीलंबोदर गणनायक.
चौदा विद्या,चौसष्ट कलांचागणाधीश अधिपती,सुखकर्ता दुःखहर्ताबुद्धिप्रदाता गणपती.
वक्रतुंड गजाननाभालचंद्र सर्वेश्वरा,मंगलमूर्ती मोरयाभक्तांवरी कृपा करा.
लाल जास्वंद नी दुर्वामोदक नैवेद्य अर्पिला,श्री गजाननाच्या चरणीतव माथा टेकविला.
गौरी गणपती सण
गौराई - मराठी कविता
गौराई माझी लाडकी गौराई, छान नटून थटून सोनपावलांनी आली, साज शृंगार करून. सजे अंगणी रांगोळी, दारी आंब्याचे तोरण गोळा होई नातलग, शिजे...
-
गौराई माझी लाडकी गौराई, छान नटून थटून सोनपावलांनी आली, साज शृंगार करून. सजे अंगणी रांगोळी, दारी आंब्याचे तोरण गोळा होई नातलग, शिजे...
-
नागपंचमी श्रावणमासी पहिला सण, नागपंचमी नाग पुजन. साप हा मित्र शेतकऱ्यांचा, नाश करितो त्या मूषकांचा. नका मारू हो तुम्ही सापांना, ...
-
Ahilya BaiHolkar Poem - लोक कल्याणकारी राणी अहिल्या लोक कल्याणकारी राणी अहिल्या विलक्षण प्रतिभेची धनी राणी अहिल्यादेवी होळकर, मराठ्या...

