Friday, August 2, 2024

मराठी कविता - गृहिणी

 मराठी कविता - गृहिणी


 उगवता ही सकाळ

 घाई काम नी धंद्याची,

 घरा येई घरपण 

आहे गृहिणी मानाची.


 घरातील सदस्यांची

 घेई काळजी प्रेमाने,

त्याग आणि समर्पण

करी कर्तव्य नेमाने.



आई हाक ती मारता

बाळे जेव्हा बिलगती, 

झाले घराचे गोकुळ 

नेत्रकडा ओलावती.


 घ्यावे लागे जुळवून 

 घरातील प्रत्येकाशी,

 गृहिणीकरिता घर

 हेच स्वर्ग आणि काशी.


 वाटे मनाला अस्वस्थ

 थोडी काढूया सवड,

 दूर होई अस्वस्थता

 जपू आपली आवड.


 काही असाव्या मैत्रिणी 

 हितगुज साधायाला,

 मन हे रिते होताच

 मिळे दिलासा मनाला.

No comments:

Post a Comment

गणेशाचे आगमन - मराठी कविता

  गणेशाचे आगमन   भाद्रपद  चतुर्थीला  गणेशाचे  आगमन, सर्वांरंभी  पूजोनीया  करू स्वागत वंदन.  महादेव  पार्वतीचा  सुकुमार  गणपती,  स्वामी चौसष्...