The Blog contains the collection of Marathi Poems which are written by Mrs. Surekha Borkar. माझ्या मनातील भाव म्हणजे माझी कविता, भावना काव्य रुपाने नित वाहे ती सरिता||१|| कवीमन नाजुकसे कागदावर उतरे, कोवळे, हळवे ,शांत सत्य ,वास्तव साकारे||२|| भावभावनांचा मेळ माझ्या कवितेचा गाव, हृदयाला पाझर फुटे घेई मनातील ठाव ||३|| कविता माझा आनंद नाद लहर तरंग, प्रतिसाद देई मन रसिक माझा श्रीरंग ||४|| अक्षरें ती शब्दरूपी कळ्या, पुष्पे वेचियेले, मनाचीये भावनेने श्रीहरीस अर्पियेले ||५||
Thursday, June 8, 2023
Ice Golewala Poem - आला आला गोलेवाला
Thursday, May 18, 2023
ग्रीष्म ऋतु कविता
ग्रीष्म ऋतु
ऋतू वसंत संपता,
ग्रीष्म ऋतु सुरुवात.
लख्ख प्रकाश सूर्याचा,
तेज प्रखर नभात.
उष्णतेने तापे धरा,
उन्हाळ्याच्या दिवसात.
तृण वेली करपती,
तप्त उन्ह तडाख्यात.
नैसर्गिक जलस्त्रोत,
आटलेले धरेवर.
प्राणी पाण्याच्या शोधात,
पशु, पक्षी सैरभैर.
भर दुपारी उन्हात,
जीव शोधितो सावली.
थंडगार पाणी पिता,
मिटे जीवाची काहिली.
पाणी टंचाई सामना,
ठरलेला उन्हाळ्यात.
पेटे वैशाख वणवा,
रानमेवा हा रानात.
पहाटेच्या प्रहराला,
देई मोगरा सुगंध.
आमराई बहरून,
वनी दरवळे गंध.
गौराई - मराठी कविता
गौराई माझी लाडकी गौराई, छान नटून थटून सोनपावलांनी आली, साज शृंगार करून. सजे अंगणी रांगोळी, दारी आंब्याचे तोरण गोळा होई नातलग, शिजे...
-
गौराई माझी लाडकी गौराई, छान नटून थटून सोनपावलांनी आली, साज शृंगार करून. सजे अंगणी रांगोळी, दारी आंब्याचे तोरण गोळा होई नातलग, शिजे...
-
नागपंचमी श्रावणमासी पहिला सण, नागपंचमी नाग पुजन. साप हा मित्र शेतकऱ्यांचा, नाश करितो त्या मूषकांचा. नका मारू हो तुम्ही सापांना, ...
-
Ahilya BaiHolkar Poem - लोक कल्याणकारी राणी अहिल्या लोक कल्याणकारी राणी अहिल्या विलक्षण प्रतिभेची धनी राणी अहिल्यादेवी होळकर, मराठ्या...

