Showing posts with label रक्षाबंधन कविता - Rakshabandhan Kavita in Marathi. Show all posts
Showing posts with label रक्षाबंधन कविता - Rakshabandhan Kavita in Marathi. Show all posts

Tuesday, August 29, 2023

रक्षाबंधन कविता - Rakshabandhan Kavita in Marathi

 नाते बहिण-भावाचे

   

 श्रावण पौर्णिमेला,

 आला रक्षाबंधन  सण.

 बहीण-भावाच्या प्रेमाचा,

 गोड आनंदाचा क्षण.


श्रावण महिन्यात येणार्‍या पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो. हा सण म्हणजे प्रेम, संयमाचा संयोग होय. सर्व नात्यांमध्ये  भाऊ बहिणीचे नाते निस्वार्थी व पवित्र असते. बहिण भावाच्या नात्यात प्रेमळपणा व एकमेकांप्रती स्नेहभाव, विश्वास, असतो.एकाच मातेच्या पोटी जन्म घेतल्यामुळे आपुलकी, जिव्हाळा असतो.


हिंदू संस्कृती प्रमाणे या दिवशी बहीण भावाला  टिळा लावून ओवाळते. हातावर राखी बांधते. गोड  पदार्थ, मिठाई भावास खाऊ घालते. भाऊ पण बहिणीला भेट वस्तू देत असतो आणि  रक्षणाचे वचन भाऊ बहिणीला देतो.


महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण भाऊ सखा म्हणून द्रोपदीला लाभला. एकदा श्रीकृष्णाच्या बोटाला रक्त आले असता द्रोपदी ने आपल्या साडीचा पदर   पटकन फाडून कृष्णाच्या बोटाला पट्टी बांधली. तेव्हा श्रीकृष्णाने  द्रौपदीची रक्षा करायचे असे ठरविले.

जेव्हा स्त्री असुरक्षित असते तेव्हा तिला तिच्या जवळच्या व्यक्तीची आठवण होते. ती व्यक्ती  म्हणजे तीचा पाठीराखा  भाऊ.  संकटाच्या प्रसंगाला,  सुखदुःखाच्या वेळी  बहिणी सोबत खंबीरपणे उभा राहतो. बहिण भावाच्या अतूट नात्याचा, प्रेम संबंधाचा रक्षाबंधन हा सण आहे.


रक्षाबंधन कविता - Rakshabandhan Kavita in Marathi




रक्षाबंधन कविता - Rakshabandhan Kavita in Marathi



बंध पवित्र प्रेमाचे 



श्रावणात  पौर्णिमेला
 सण  रक्षाबंधनाचा,
 भाऊ-बहीण प्रेमाचा
 गोड क्षण आनंदाचा. 
 
राखी बांधते बहिण 
भाऊराया  हातावरी, 
देई रक्षेचे वचन 
भाऊ बैसे पाटावरी. 

सुखी राहो भाऊराया
करी प्रार्थना बहिणी,
उपहार देई भाऊ
बहिणीला ओवाळणी. 

सुख दुःखाच्या प्रसंगी
उभा राही पाठीराखा,
संकटात साह्य करी 
कृष्ण द्रौपदीचा सखा.

 नाते बहीण भावाचे 
 अनमोल विश्वासाचे,
  जसे कृष्ण द्रौपदीचे
  बंध पवित्र प्रेमाचे.

गणेशाचे आगमन - मराठी कविता

  गणेशाचे आगमन   भाद्रपद  चतुर्थीला  गणेशाचे  आगमन, सर्वांरंभी  पूजोनीया  करू स्वागत वंदन.  महादेव  पार्वतीचा  सुकुमार  गणपती,  स्वामी चौसष्...