श्रावणी सोमवार
आला श्रावण महिना
सण व्रत वैकल्यांचा,
शिवदिनी सोमवारी
चाले जागर भक्तीचा.
देवी सती करी प्रण
पती मिळावा शंकर,
तपश्चर्या ही कठोर
प्राप्त महादेव वर.
शंकराची उपासना
श्रावणाच्या महिन्यात,
हर हर महादेव
गुंजे स्वर मंदिरात.
बेल वाहता पिंडीला
शिवमुठ ही अर्पन,
सुवासिनी करीतसे
शिव शक्तीचे पूजन.
ओम नमः शिवाय हा
मंत्र शिव शंकराचा,
निरंतर जपे भक्त
नाश होतसे पापांचा.
No comments:
Post a Comment