Marathi Poem On Hartalika Vrat
हरितालिका व्रत
भाद्रपद तृतीयेला
व्रत हरितालिकेचे,
सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ
वाढे सौभाग्य स्त्रियांचे.
पार्वतीने केले व्रत
पती महादेवासाठी,
सुवासिनी करी व्रत
पती दीर्घायुष्यासाठी.
पिंड वाळूची स्थापूनी
पूजा मांडली गुहेत,
पर्णे खाऊन वृक्षाची
तपश्चर्या अरण्यात.
पूजा षोडशोपचारे
करूनिया उपवास,
रात्री केले जागरण
आली करूणा देवास.
पती म्हणून वरले
मनोमनी महादेव,
पूर्व संचिताने प्राप्त
वर हा देवाधिदेव.
No comments:
Post a Comment