श्री गजानन हे बुद्धीचे देवता आहे ज्यांना सर्व विघ्न दूर करणारे देवता हि म्हटले जाते. ते सर्व कार्यांमध्ये प्रथमपुज्य आहे. त्यांच्या दर्शनाने मात्र सर्वांच्या मनात आनंद, उत्साह, जगण्याचे बळ आणि सगळ्यांना सुख-समृद्धी मिळते. त्याच्या नामाचा जप करणे, त्यांची आरती करणे हे सगळ्या भाविकांना प्रिय असतं. गणेशाचं नाम सर्वांना खूप मोठं आनंद देतो. गणेश आणि त्याच्या नामाचं गुणगान करतांना जीवनात आनंदच येतो आणि अनेकांच्या कष्टाचे समाधान होते. हा अनुभव सुखाचा आणि शांतीचा असतो. ह्या ब्लॉग ची सुरवात मी श्री गजाननाच्या मराठी कवितेने (shri ganesh marathi poem) करणार आहे.
The Blog contains the collection of Marathi Poems which are written by Mrs. Surekha Borkar. माझ्या मनातील भाव म्हणजे माझी कविता, भावना काव्य रुपाने नित वाहे ती सरिता||१|| कवीमन नाजुकसे कागदावर उतरे, कोवळे, हळवे ,शांत सत्य ,वास्तव साकारे||२|| भावभावनांचा मेळ माझ्या कवितेचा गाव, हृदयाला पाझर फुटे घेई मनातील ठाव ||३|| कविता माझा आनंद नाद लहर तरंग, प्रतिसाद देई मन रसिक माझा श्रीरंग ||४|| अक्षरें ती शब्दरूपी कळ्या, पुष्पे वेचियेले, मनाचीये भावनेने श्रीहरीस अर्पियेले ||५||
Sunday, March 19, 2023
Shri Gajanan Marathi Poem - श्री गजानन मराठी कविता
आला आनंद घेऊन
गौरी गणपती सण,
घरोघरी उत्साहात
झाले श्रींचे आगमन.
भक्ती गंध दरवळे
गणेशाच्या आगमने,
गणेशाला अर्पियेते
दुर्वांकुर नी सुमने.
कार्य आरंभी पूजीते
तुला गौरीच्या नंदना,
आराधना गणेशाची
प्रसन्नता लाभे मना.
सोनपावलाने आली
गौरी माहेरवाशिणी,
ज्येष्ठ नक्षत्री पूजन
ज्येष्ठा, कनिष्ठा भगिनी.
चैतन्याचा हा सोहळा
सुख समृद्धी घरात,
चाले जागर भक्तीचा
जीव रमे भजनात.
अभंग (छोटा)
शीर्षक - गजानन
झाले श्रींचे आगमन | आनंदले तनमन||
बाळ पार्वती नंदन | एकदंत गजानन||
करु प्रथम नमन | वाहु दुर्वा नी सुमन||
शोभे भाळी हे चंदन | स्वारी मुषक वाहन||
Subscribe to:
Post Comments (Atom)
गणेशाचे आगमन - मराठी कविता
गणेशाचे आगमन भाद्रपद चतुर्थीला गणेशाचे आगमन, सर्वांरंभी पूजोनीया करू स्वागत वंदन. महादेव पार्वतीचा सुकुमार गणपती, स्वामी चौसष्...
-
क्षमा - Kshama Kavita In Marathi क्षमा सर्व धर्मीयांमध्ये क्षमेला महत्त्वाचे स्थान, क्षमा करणे मानवाचा गुणधर्म हेच खरे क्षमेचे तत्वज्ञा...
-
Ram Navami Poem - राम नवमी कविता 1. अयोध्या नरेश श्रीराम कौसल्या सुपुत्र श्रीराम कुलदीपक रघुवश्यांचे, राम नाम स्मरता नित्य दुःख हर...
-
मराठी कविता - पंढरपुर आम्हां काशी पंढरीचा पांडुरंग आम्हां आराध्य दैवत, आषाढी वारीत वारकरी उत्साह आनंदाने नाचत. ऊन, वारा, पाऊस अंगावरी ...
No comments:
Post a Comment