महाराष्ट्र दिन कविता - Maharashtra Din Poem |
माझा महाराष्ट्र |
माझा महाराष्ट्र
महाराष्ट्र देश माझा,
साधूसंत महात्म्यांचा.
रांगा गिरी सह्याद्रीच्या,
शूरवीर मावळ्यांचा.
उंच डोंगरकपारी
सौंदर्याने नटलेला,
देश समृद्ध संपन्न
गोदा, कृष्णा लाभलेला.
ज्ञानेश्वर, तुकाराम
थोर संत वारकरी,
वैष्णवांची मांदियाळी
उभा विठ्ठल पंढरी.
वीर जिजाऊ, सावित्री
महाराष्ट्र जन्मभूमी,
जनाबाई, मुक्ताबाई
नारी संत पुण्यभूमी.
पराक्रम गाजवीत,
राजा शिवाजी महान,
मावळ्यांच्या मदतीने
केले स्वराज्य निर्माण .
नाना पंथ, धर्म जाती
नांदे ह्या महाराष्ट्रात,
हीच आम्हा कर्मभूमी,
शान वाढवू जगात.
No comments:
Post a Comment