Thursday, July 20, 2023

Poem On Tuberose - मराठी कविता निशिगंध


Poem On Tuberose - मराठी कविता निशिगंध 


निशिगंध 


निशिगंध Poem


 

 निशिगंधाचे 

झाड अंगणी 

सुखवती ते 

 मज लोचनी ||


रात्रीच्या वेळी 

पसरे  गंध

 सुवासिक तो 

हा निशिगंध||


फुले येतात 

टोका वरती

 गजरा शोभे 

वेणी वरती||


निशिगंध हा

मनमोहक

 सुंदर असे

सौख्यदायक ||


वाऱ्यासोबत 

मंद सुगंध 

प्रीतीच्या संगे 

हा निशिगंध||


Monday, July 3, 2023

गुरुपौर्णिमा - Poem On Gurupournima

 जीवनाचे सार्थक गुरुच 


गुरुर ब्रम्हा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, 

गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः||


  आषाढ महिन्यातील पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा.  गुरूंचे गुरू महर्षी व्यास यांचे स्मरण या दिवशी केली जाते तसेच गुरु बद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.

 भारतात पूर्वीपासून गुरु-शिष्य परंपरा आहे आयुष्य जगत असताना प्रत्येकाच्या जीवनात गुरुचे स्थान सर्वात महत्त्वाचे असते. प्रथम गुरु आई वडील असतात लहान बाळाला मातीच्या गोळ्याप्रमाणे त्याच्या जीवनाला आकार देण्याचे काम आई वडील करतात. पुढे शाळेत गेल्यावर  शिक्षक गुरु असतात ते विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून  घडवितात.

 गुरु चरणी ठेविता भाव| 

आपोआप भेटे देव||

 तुकाराम महाराजांचे मते गुरू चरणाशी जर आपण शुद्ध सात्विक भावनेने शरण गेलो तर आपणास आपोआप देव भेटेल. गुरूचा महिमा अगाध आणि अथांग आहे गुरु विद्येचे आगर, ज्ञानाचे सागर आहे. गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण साकार रूप गुरुकृपेने शिष्याला आत्मनंदाचे ज्ञान होते. सद्गुरू ही व्यक्ती नसून एक चैतन्यरुपी शक्ती आहे. सद्गुरू आपल्याला दिशा दाखवतात दृष्टी देतात. मिथ्या अहंकार न ठेवता आपण सद्गुरुस  शरण गेले पाहिजे. लहान बालक जसे  आपल्या आईवर विश्वास ठेवते त्याप्रमाणे भक्ताने आपल्या गुरूवर श्रद्धा  ठेवावी. माता पिता हे आपले जन्मदाता असले तरी सद्गुरु आपले भाग्यविधाता असते. आपल्‍या जीवनाला एक नवी दिशा मिळते आणि आपल्या जीवनाचे सार्थक झाले  असा भाव मनात निर्माण निर्माण होतो.

 गुरु माझी माता, गुरु माझा पिता|

 गुरु सर्वांचा मुक्तिदाता|| 







सद्गुरु 

 

गुरु माझी माता, गुरु माझा पिता

 गुरु सर्वांचा मुक्तिदाता

 

 गुरूपासोनी  मिळते आत्मज्ञान

 गुरूच्या चरणाशी जावे शरण

  

 गुरु माझी माऊली, प्रेमाची सावली

 गुरु आम्हां लेकरांसी सांभाळी

  

 गुरु माझे कृपेचा सागर 

 सद्गुरु एक तुम्ही आधार

 

अल्पबुद्धी माझी गुरुराया 

माझे दंडवत तुमच्या पाया.




Wednesday, June 28, 2023

Poem On Vithhal - पांडुरंग मराठी

 पांडुरंग 


Poem On Vithhal -  पांडुरंग मराठी


 पंढरीत, हृदयात, तोच नांदत आहे

 चंद्रभागेतिरी  उभा  पांडुरंग  आहे.


 भक्तांच्या हाकेला, धाव घेई जगजेठी

वैकुंठ सोडूनी आला,भक्त पुंडलिकासाठी.


 पांडुरंग मायबाप, दुःखाचा भार वाहे

 साऱ्या जगताचा, तोच विधाता आहे.


कुणी नसे त्याच्यापुढं,  लहान आणि थोर

अवघेजन  आम्ही  त्याचीच  लेकरं.


नाम विठोबाचे गोड, होऊ भजनात दंग

लावी मनाला तो वेड, गाऊ सदा अभंग.

Wednesday, June 21, 2023

Poem On Yoga - योग विद्या कविता

 योग विद्या

योग विद्या


 भारतीय संस्कृतीने

 जगा दिली योग विद्या,

 सर्व मानव  जातीस

 आहे संजीवनी‌ विद्या.


 सामाजिक जीवनात

 खूप महत्त्व योगाचे,

 दररोज  योगाभ्यास

 निर्मूलन विकारांचे.


 शरीराची वाढू लागे

 रोग प्रतिकार शक्ती,

 नाना योगाचे प्रकार 

ध्यान देई  मन:शांती.


 प्राणायाम, योगासने

 ठेवी सशक्त मनाला,

 अनमोल हे जीवन

 ठेवू सुदृढ तनाला.



 चित्त वृत्तीचा निरोध

 योग एक तत्वज्ञान

 नियमित सरावाने 

आत्म जागृती निर्माण.

Saturday, June 17, 2023

Marriage Poem in Marathi - लग्न कविता मराठी

 लग्न 


Marriage Poem in Marathi -  लग्न कविता मराठी


कन्या, मुलगा

 वयात  येता.. 

लग्नाचा  बेत

 ठरवी  पिता...


 सगेसोयरे 

एकत्र येती..

 वधू मंडपी 

वरात नेती...


 दोन जीवांचा

 लग्नसोहळा..

 थाटामाटात

 हर्ष आगळा...


 जीवनी साथ

 एकमेकांची..

 शुभाशीर्वाद

 लाभे थोरांची...


 गृहस्थाश्रम

 हा वधूवरा..

 कर्मयोगाने

सुख संसारा...


Friday, June 16, 2023

पावसाळा कविता - poem on Rainy Season


काव्यप्रकार  प्रणूचाराक्षरी


 पावसाळा


पावसाळा कविता  - rain poem


 पावसाळा 

ऋतु आला..!

 मेघ नभी 

 दाटलेला...!!


थंडगार 

 वाहे वारा..!

 बरसती

  जलधारा...!!


 रिमझिम

 कोसळती..!

 जीवनात  

हर्षवती...!!


  वसुंधरा  

 तृप्तावती..!

 नव बीज 

अंकुरती...!!


वृक्षवेली

 नटलेली..!

 हिरवळ

 वेढलेली...!!


  चराचर

 आनंदले..! 

 पशुपक्षी 

सुखावले...!!


 शेतकरी 

सुखावला..! 

पाऊस तो 

कोसळला...!!

 धरणीला

 सुजलाम..!

 बनवतो

 सुफलाम...!!

Friday, June 9, 2023

Poem On Tiger - वाघ कविता

वाघ


tiger poem




वाघ


 शुर, शक्तीशाली वाघ,

 अतिशय हिंस्त्र प्राणी.

 वाघ समोर दिसता,

 घाबरत असे वाणी.


 वाघ हा राष्ट्रीय प्राणी,

प्राणी माजंर  कुळात.

मांसाहारी नी साहसी, 

त्याचे वास्तव्य रानात.


रंग वाघांचा पिवळा,

पट्टे हे काळ्या रंगाचे.

दिसे हा रुबाबदार,

आहे प्रतीक शौर्याचे.


 पौराणिक कथेमध्ये, 

 दुर्गा  देवीचे  वाहन. 

येता शिकार जवळी,

 हल्ला झडप घालून.


 वाघ वाचविण्यासाठी,

 व्याघ्र प्रकल्प देशात.

 करू व्याघ्र संरक्षण,

 स्थान त्याचे जंगलात.



Thursday, June 8, 2023

Ice Golewala Poem - आला आला गोलेवाला

 

आला आला गोलेवाला


Ice Golewala



आला आला गोलेवाला 
गोला घेऊ चला चला,
वाट  पाहे  सर्वजण
थंडगार  छान गोला.

बर्फगोला आहे  गोड
वेगळाले रंग त्याचे,
लाल, हिरवा ,पिवळा 
रूप  खुलवी  गोल्याचे.

गोलेवाल्याकडे  मिळे 
लिंबू  सरबत छान, 
लिंबू सरबत पीता 
भागे आमची तहान.

उन्हामध्ये  गोळा होती
सान, थोर  सारेजण,
थंडगार   बर्फगोला
खाता  तृप्त झाले  मन.


Tuesday, May 30, 2023

Ahilya Bai Holkar Poem - लोक कल्याणकारी राणी अहिल्या

  Ahilya BaiHolkar Poem - लोक कल्याणकारी राणी  अहिल्या


Ahilya Bai Holkar Poem - अहिल्या बाई होळकर मराठी कविता


लोक कल्याणकारी राणी  अहिल्या


 विलक्षण प्रतिभेची धनी

 राणी अहिल्यादेवी होळकर,

 मराठ्यांच्या इतिहासात

 राणी अहिल्येचे  नाव अजरामर.


खंडेरावांची   अर्धांगिनी 

धर्मपरायण, चारित्र्यसंपन्न,

संसार सुखाचा असतांना

लढाईत  खंडेरावास वीरमरण.



 दुःखाचे आघात  सोसुनी 

 उभी राहिली राज्य, प्रजेसाठी, 

 निस्सीम  शिवभक्त आहिल्यादेवी

 जीवन अर्पियेले  सेवेसाठी.


अहिल्यादेवी बाणेदार, स्वाभिमानी 

अनिष्ट प्रथांचे करी उच्चाटन, 

मंदिरे, पानपोई, धर्मशाळा बांधुनी 

जनमानसात मिळविले स्थान.


लोक कल्याणकारी राणी अहिल्या    

कर्तृत्ववान, कुशल प्रशासक,

 दानशूर, पराक्रमी, कर्तबगार

 कार्य त्यांचे  प्रेरक नी  मार्गदर्शक.

Thursday, May 18, 2023

ग्रीष्म ऋतु कविता

 ग्रीष्म ऋतु 


ग्रीष्म ऋतु


 ऋतू वसंत संपता,

 ग्रीष्म ऋतु सुरुवात. 

लख्ख प्रकाश सूर्याचा,

  तेज  प्रखर  नभात.


 उष्णतेने तापे धरा,

 उन्हाळ्याच्या दिवसात.

 तृण  वेली  करपती, 

 तप्त उन्ह  तडाख्यात.


 नैसर्गिक  जलस्त्रोत, 

 आटलेले  धरेवर.

 प्राणी  पाण्याच्या शोधात,

 पशु, पक्षी   सैरभैर.



 भर  दुपारी  उन्हात, 

जीव  शोधितो  सावली.

थंडगार पाणी पिता,

मिटे जीवाची काहिली. 


पाणी टंचाई सामना,

ठरलेला उन्हाळ्यात.

पेटे  वैशाख वणवा,

रानमेवा हा रानात.


 पहाटेच्या प्रहराला,

  देई  मोगरा  सुगंध.

  आमराई   बहरून,

  वनी  दरवळे  गंध.


वाट पाही बालमन

आतुरता  उन्हाळ्याची,

सुट्टी लागता शाळेला

ओढ मामाच्या गावाची

गणेशाचे आगमन - मराठी कविता

  गणेशाचे आगमन   भाद्रपद  चतुर्थीला  गणेशाचे  आगमन, सर्वांरंभी  पूजोनीया  करू स्वागत वंदन.  महादेव  पार्वतीचा  सुकुमार  गणपती,  स्वामी चौसष्...