पांडुरंग
पंढरीत, हृदयात, तोच नांदत आहे
चंद्रभागेतिरी उभा पांडुरंग आहे.
भक्तांच्या हाकेला, धाव घेई जगजेठी
वैकुंठ सोडूनी आला,भक्त पुंडलिकासाठी.
पांडुरंग मायबाप, दुःखाचा भार वाहे
साऱ्या जगताचा, तोच विधाता आहे.
कुणी नसे त्याच्यापुढं, लहान आणि थोर
अवघेजन आम्ही त्याचीच लेकरं.
नाम विठोबाचे गोड, होऊ भजनात दंग
लावी मनाला तो वेड, गाऊ सदा अभंग.
No comments:
Post a Comment