The Blog contains the collection of Marathi Poems which are written by Mrs. Surekha Borkar. माझ्या मनातील भाव म्हणजे माझी कविता, भावना काव्य रुपाने नित वाहे ती सरिता||१|| कवीमन नाजुकसे कागदावर उतरे, कोवळे, हळवे ,शांत सत्य ,वास्तव साकारे||२|| भावभावनांचा मेळ माझ्या कवितेचा गाव, हृदयाला पाझर फुटे घेई मनातील ठाव ||३|| कविता माझा आनंद नाद लहर तरंग, प्रतिसाद देई मन रसिक माझा श्रीरंग ||४|| अक्षरें ती शब्दरूपी कळ्या, पुष्पे वेचियेले, मनाचीये भावनेने श्रीहरीस अर्पियेले ||५||
Tuesday, March 28, 2023
Ram Navami Poem - राम नवमी कविता
Thursday, March 23, 2023
Gudi Padva Poem - गुढीपाडवा मराठी कविता
गुढीपाडवा मराठी कविता - Gudipadva Poem in Marathi
1. गुढीपाडवा
2. गुढीपाडवा
सण आला हो चैत्रात गुढीपाडव्याचा.. घरात विजयाची गुढी उभारण्याचा..
रेशमी वस्त्र,कडुलिंबाची डहाळी बांबूची काठी.. तांब्याचा गडवा,त्यावर शोभे साखरेची गाठी..
गुढी उभारावी समृद्धीची.. मनी कामना धरावी मांगल्याची.. दारी शोभे तोरणे आंब्याच्या पानांची.. खाण्याची मज्जा असते कैरी पन्हे आणि श्रीखंडपुरीची..
चैत्रात होते वसंत ऋतू च आगमन.. झाडे वेली सजतात नव्या पालवीन..
गुढी हे प्रतीक आहे स्नेहाचे.. स्वागत करूया आनंदाने नववर्षाचे..
3. सण गुढीपाडवा
4. गुढी उभारू
Sunday, March 19, 2023
Shri Gajanan Marathi Poem - श्री गजानन मराठी कविता
श्री गजानन हे बुद्धीचे देवता आहे ज्यांना सर्व विघ्न दूर करणारे देवता हि म्हटले जाते. ते सर्व कार्यांमध्ये प्रथमपुज्य आहे. त्यांच्या दर्शनाने मात्र सर्वांच्या मनात आनंद, उत्साह, जगण्याचे बळ आणि सगळ्यांना सुख-समृद्धी मिळते. त्याच्या नामाचा जप करणे, त्यांची आरती करणे हे सगळ्या भाविकांना प्रिय असतं. गणेशाचं नाम सर्वांना खूप मोठं आनंद देतो. गणेश आणि त्याच्या नामाचं गुणगान करतांना जीवनात आनंदच येतो आणि अनेकांच्या कष्टाचे समाधान होते. हा अनुभव सुखाचा आणि शांतीचा असतो. ह्या ब्लॉग ची सुरवात मी श्री गजाननाच्या मराठी कवितेने (shri ganesh marathi poem) करणार आहे.
श्री गजानन मराठी कविता - Shri Gajanan Marathi Kavita
प्रथम नमन हेश्री गजानना तुजला,भक्तगण पूजती तुलासद्बुद्धी दे तूं मजला.
ओंकार स्वरूप तूंगौरी पुत्र विनायक,एकदंत विघ्ननिवारीलंबोदर गणनायक.
चौदा विद्या,चौसष्ट कलांचागणाधीश अधिपती,सुखकर्ता दुःखहर्ताबुद्धिप्रदाता गणपती.
वक्रतुंड गजाननाभालचंद्र सर्वेश्वरा,मंगलमूर्ती मोरयाभक्तांवरी कृपा करा.
लाल जास्वंद नी दुर्वामोदक नैवेद्य अर्पिला,श्री गजाननाच्या चरणीतव माथा टेकविला.
गौरी गणपती सण
गणेशाचे आगमन - मराठी कविता
गणेशाचे आगमन भाद्रपद चतुर्थीला गणेशाचे आगमन, सर्वांरंभी पूजोनीया करू स्वागत वंदन. महादेव पार्वतीचा सुकुमार गणपती, स्वामी चौसष्...
-
क्षमा - Kshama Kavita In Marathi क्षमा सर्व धर्मीयांमध्ये क्षमेला महत्त्वाचे स्थान, क्षमा करणे मानवाचा गुणधर्म हेच खरे क्षमेचे तत्वज्ञा...
-
Ram Navami Poem - राम नवमी कविता 1. अयोध्या नरेश श्रीराम कौसल्या सुपुत्र श्रीराम कुलदीपक रघुवश्यांचे, राम नाम स्मरता नित्य दुःख हर...
-
मराठी कविता - पंढरपुर आम्हां काशी पंढरीचा पांडुरंग आम्हां आराध्य दैवत, आषाढी वारीत वारकरी उत्साह आनंदाने नाचत. ऊन, वारा, पाऊस अंगावरी ...