Tuesday, August 6, 2024

मराठी कविता - आठवणी

 आठवणी 



 आठवते  अजूनही 

 निरागस  बालपण,

 शांत सरिता किनारी

 एकांतात  रमे मन.


 रम्य ते  लहानपण

 मौजमजा  खेळण्यात,

 मोठे  होताना कळले

 वेळ काळाच्या हातात.


 जुन्या गोड आठवणी 

 असे कायम स्मरणी, 

 उडे हास्याचे कारंजे 

 जेव्हा एकत्र मैत्रिणी.


 रुंजी घालते मनात 

 कडू गोड आठवणी,

 राही मनाच्या कुपीत

 अलवार साठवणी.


 सहवास आठवांचा

 राही मनात जपून,

 जगु आठवणीसंगे 

 भाव अंतरी ठेवून.

स्वामी विवेकानंद -तरुणांचे प्रेरणास्थान

 स्वामी विवेकानंद -तरुणांचे प्रेरणास्थान



स्वामी विवेकानंद -तरुणांचे प्रेरणास्थान



 स्वामी विवेकानंदाचे

 विश्वनाथ दत्त पिता,

 माता भुवनेश्वरीच्या

 पोटी जन्म कोलकत्ता.


 बालपणी स्वामीवर 

केले मातेने संस्कार,

लाभे गुरु रामकृष्ण

केला अध्यात्म प्रसार.


अष्टपैलू व्यक्तिमत्व 

नाना खेळात प्रवीण,

विवेकानंदाच्या अंगी

वसे  नेतृत्वाचे  गुण. 


रामकृष्ण  मिशनची

केली मठाची स्थापना, 

योग ध्यान माध्यमाने

करी अखंड साधना.


 सर्वधर्म  परिषद

 व्याख्यानाची गोड वाणी 

 देई  प्रेरणा  युवका 

 स्वामी विचारांचे धनी.

Friday, August 2, 2024

मराठी कविता - गृहिणी

 मराठी कविता - गृहिणी


 उगवता ही सकाळ

 घाई काम नी धंद्याची,

 घरा येई घरपण 

आहे गृहिणी मानाची.


 घरातील सदस्यांची

 घेई काळजी प्रेमाने,

त्याग आणि समर्पण

करी कर्तव्य नेमाने.



आई हाक ती मारता

बाळे जेव्हा बिलगती, 

झाले घराचे गोकुळ 

नेत्रकडा ओलावती.


 घ्यावे लागे जुळवून 

 घरातील प्रत्येकाशी,

 गृहिणीकरिता घर

 हेच स्वर्ग आणि काशी.


 वाटे मनाला अस्वस्थ

 थोडी काढूया सवड,

 दूर होई अस्वस्थता

 जपू आपली आवड.


 काही असाव्या मैत्रिणी 

 हितगुज साधायाला,

 मन हे रिते होताच

 मिळे दिलासा मनाला.

गणेशाचे आगमन - मराठी कविता

  गणेशाचे आगमन   भाद्रपद  चतुर्थीला  गणेशाचे  आगमन, सर्वांरंभी  पूजोनीया  करू स्वागत वंदन.  महादेव  पार्वतीचा  सुकुमार  गणपती,  स्वामी चौसष्...