नागपंचमी
श्रावणमासी पहिला सण,
नागपंचमी नाग पुजन.
साप हा मित्र शेतकऱ्यांचा,
नाश करितो त्या मूषकांचा.
नका मारू हो तुम्ही सापांना,
इजा होईल मुक्या प्राण्यांना.
देऊ सापांना जीवनदान,
आम्हीं वाचवू सापांचे प्राण.
नागमंदिरी बाऱ्या म्हणती,
नागाची पूजा प्रथा जपती.
No comments:
Post a Comment