Tuesday, July 30, 2024

स्वामी विवेकानंद -तरुणांचे प्रेरणास्थान

 स्वामी विवेकानंद -तरुणांचे प्रेरणास्थान




 स्वामी विवेकानंदाचे

 विश्वनाथ दत्त पिता,

 माता भुवनेश्वरीच्या

 पोटी जन्म कोलकत्ता.


 बालपणी स्वामीवर 

केले मातेने संस्कार,

लाभे गुरु रामकृष्ण

केला अध्यात्म प्रसार.


अष्टपैलू व्यक्तिमत्व 

नाना खेळात प्रवीण,

विवेकानंदाच्या अंगी

वसे  नेतृत्वाचे  गुण. 


रामकृष्ण  मिशनची

केली मठाची स्थापना, 

योग ध्यान माध्यमाने

करी अखंड साधना.


 सर्वधर्म  परिषद

 व्याख्यानाची गोड वाणी 

 देई  प्रेरणा  युवका 

 स्वामी विचारांचे धनी.

Wednesday, July 17, 2024

Marathi Kavita - पंढरपुर आम्हां काशी

मराठी कविता -  पंढरपुर आम्हां काशी 


Marathi Kavita on Vitthal -  पंढरपुर आम्हां काशी


पंढरीचा पांडुरंग 

आम्हां आराध्य दैवत, 

आषाढी वारीत वारकरी

 उत्साह आनंदाने नाचत.


ऊन, वारा, पाऊस अंगावरी 

झेलित चाले वैष्णवजन, 

विठूरायाला भेटण्याची आस 

 मुखाने करी नामस्मरण. 


टाळ मृदुंगाची साथ

कीर्तन सुखाची पर्वनी,

हरिपाठ, पाऊली करत

वारकरी माऊलीच्या दर्शनी.


 दिंड्या, पताका, पालख्या

 एकत्र होई पंढरीत, 

 विठू नामाचा गजर

 रात्रंदिन चाले वारीत.


 चंद्रभागेच्या वाळवंटी 

 फुलला वैष्णवांचा मळा,

 वैष्णव दंग अभंगात

 अनुपम्य हा सोहळा.


 आत्मबोध होण्या वारी 

 विठ्ठल नाम अविनाशी, 

 विठ्ठल रखुमाई मायबाप

 पंढरपूर हे आम्हां काशी.

गणेशाचे आगमन - मराठी कविता

  गणेशाचे आगमन   भाद्रपद  चतुर्थीला  गणेशाचे  आगमन, सर्वांरंभी  पूजोनीया  करू स्वागत वंदन.  महादेव  पार्वतीचा  सुकुमार  गणपती,  स्वामी चौसष्...