Thursday, July 20, 2023

Poem On Tuberose - मराठी कविता निशिगंध


Poem On Tuberose - मराठी कविता निशिगंध 


निशिगंध 


निशिगंध Poem


 

 निशिगंधाचे 

झाड अंगणी 

सुखवती ते 

 मज लोचनी ||


रात्रीच्या वेळी 

पसरे  गंध

 सुवासिक तो 

हा निशिगंध||


फुले येतात 

टोका वरती

 गजरा शोभे 

वेणी वरती||


निशिगंध हा

मनमोहक

 सुंदर असे

सौख्यदायक ||


वाऱ्यासोबत 

मंद सुगंध 

प्रीतीच्या संगे 

हा निशिगंध||


Monday, July 3, 2023

गुरुपौर्णिमा - Poem On Gurupournima

 जीवनाचे सार्थक गुरुच 


गुरुर ब्रम्हा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, 

गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः||


  आषाढ महिन्यातील पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा.  गुरूंचे गुरू महर्षी व्यास यांचे स्मरण या दिवशी केली जाते तसेच गुरु बद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.

 भारतात पूर्वीपासून गुरु-शिष्य परंपरा आहे आयुष्य जगत असताना प्रत्येकाच्या जीवनात गुरुचे स्थान सर्वात महत्त्वाचे असते. प्रथम गुरु आई वडील असतात लहान बाळाला मातीच्या गोळ्याप्रमाणे त्याच्या जीवनाला आकार देण्याचे काम आई वडील करतात. पुढे शाळेत गेल्यावर  शिक्षक गुरु असतात ते विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून  घडवितात.

 गुरु चरणी ठेविता भाव| 

आपोआप भेटे देव||

 तुकाराम महाराजांचे मते गुरू चरणाशी जर आपण शुद्ध सात्विक भावनेने शरण गेलो तर आपणास आपोआप देव भेटेल. गुरूचा महिमा अगाध आणि अथांग आहे गुरु विद्येचे आगर, ज्ञानाचे सागर आहे. गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण साकार रूप गुरुकृपेने शिष्याला आत्मनंदाचे ज्ञान होते. सद्गुरू ही व्यक्ती नसून एक चैतन्यरुपी शक्ती आहे. सद्गुरू आपल्याला दिशा दाखवतात दृष्टी देतात. मिथ्या अहंकार न ठेवता आपण सद्गुरुस  शरण गेले पाहिजे. लहान बालक जसे  आपल्या आईवर विश्वास ठेवते त्याप्रमाणे भक्ताने आपल्या गुरूवर श्रद्धा  ठेवावी. माता पिता हे आपले जन्मदाता असले तरी सद्गुरु आपले भाग्यविधाता असते. आपल्‍या जीवनाला एक नवी दिशा मिळते आणि आपल्या जीवनाचे सार्थक झाले  असा भाव मनात निर्माण निर्माण होतो.

 गुरु माझी माता, गुरु माझा पिता|

 गुरु सर्वांचा मुक्तिदाता|| 







सद्गुरु 

 

गुरु माझी माता, गुरु माझा पिता

 गुरु सर्वांचा मुक्तिदाता

 

 गुरूपासोनी  मिळते आत्मज्ञान

 गुरूच्या चरणाशी जावे शरण

  

 गुरु माझी माऊली, प्रेमाची सावली

 गुरु आम्हां लेकरांसी सांभाळी

  

 गुरु माझे कृपेचा सागर 

 सद्गुरु एक तुम्ही आधार

 

अल्पबुद्धी माझी गुरुराया 

माझे दंडवत तुमच्या पाया.




गणेशाचे आगमन - मराठी कविता

  गणेशाचे आगमन   भाद्रपद  चतुर्थीला  गणेशाचे  आगमन, सर्वांरंभी  पूजोनीया  करू स्वागत वंदन.  महादेव  पार्वतीचा  सुकुमार  गणपती,  स्वामी चौसष्...