बाळ गंगाधर टिळक
पुण्यभूमी रत्नागिरी
रत्न जन्मे या भूमीत,
बाळ अत्यंत हुशार
घेई शिक्षण पुण्यात.
वृत्ती निर्भीड साहसी
अंगी करारी तो बाणा,
शेंगा मी खाल्ल्या नाहीत
ठणकावे शिक्षकांना.
थोर स्वातंत्र्य सेनानी
मनी स्वातंत्र्याचा ध्यास,
स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी
भोगीयेला कारावास.
कर्म योगाचा सिद्धांत
लिही गीतारहस्यात,
चेतवली जनतेच्या
मनी स्वातंत्र्याची ज्योत.
शिव, गणेश जयंती
सुरुवात उत्सवाची,
होण्या जनता जागृत
भावना देशभक्तीची.
.jpeg)