ज्ञानज्योती सावित्रीमाई
जर नसती अवतरली सावित्रीमाई
महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीत,
तर स्त्री जाती राहिली असती
आजही अशिक्षित, उपेक्षित.
मुहूर्तमेढ रोवली शिक्षणाची
प्रथम शिक्षिका सावित्रीमाईने,
अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी प्रथा
झिडकारल्या विद्यादात्रीने.
अवहेलना,अपमान सहन करून
निरंतर ज्ञानदान करीत राहिली,
ज्ञानज्योती, क्रांतीज्योती
म्हणून जगी अजरामर झाली.
स्फूर्ती नायिका, विद्येची देवता
कार्य तिचे अति महान,
समस्त नारी जातीस आहे
सावित्रीबाईंचा अभिमान.
शिक्षणाची क्षेत्र सर्वांना खुले
ज्ञानाने विकसित आजची नारी,
सावित्रीमाईमुळें शिकलो, घडलो
घेतो आता आम्ही नभी उंच भरारी.
.jpeg)